कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे भयंकर तांडव; गेल्या १५ दिवसांत दगावले ‘एवढे’ रुग्ण

0
678

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात केवळ सात जण दगावले होते.यंदा मात्र एप्रिलमधील अवघ्या १५ दिवसांतच ३९६ रुग्ण दगावले आहेत.दररोजचे सरासरी प्रमाण २० आहे.पिंपळे गुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू आहेत.

बेशिस्तीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे.परिणामी, खाट मिळणे आणि त्यातल्या त्यात आयसीयू कक्षात उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याच कारणामुळे कमी वयाचे रुग्णदेखील दगावत आहेत. वेळेत उपचार आणि आयसीयू बेड मिळाला, तर हे प्रमाण कमी होऊ शकते; पण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडाही उच्चांक गाठताना दिसत आहे.गेल्या आठवड्यापासून रुग्ण वाढल्याने िंचता व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी पहिला बळी १२ एप्रिलला गेला.त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे.एवूâण बळीचा विचार करता १२ एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या ११ महिन्यात एक हजार ६३७ बळी गेल्याची नोंद आहे.मात्र, नंतरच्या अवघ्या ४० दिवसांतच १४९ जणांचे मृत्यू झाले.गेल्यावर्षी दिवसाला सरासरी ४१ संशयित रुग्ण आढळत होते. आता हा आकडा अडीच ते तीन हजार झाला आहे. त्यातही हा एप्रिल महिना फारच वाईट ठरला. १४ तारखेला ९ हजार ७५३ रुग्ण दाखल आहेत. १३ आणि १४ तारखेला एवूâण ८६ मृत्यूची नोंद झाली. काल म्हणजे गुरुवारी ५४ रुग्णांना देवाज्ञा झाली
———चौकट———
एप्रिल २०२१
तारीख रुग्ण मृत्यू
———————————
१ २११३ १७
——————————-
२ २४६३ १९
———————————-
३ २८३२ १७
——————————-
४ ३३८२ १८
———————————
५ २१५२ १६
——————————-
६ २९०४ १७
——————————-
७ २७८४ १६
——————————–
८ २३५१ २१
——————————–
९ २००९ २३
——————————–
१० २२३९ २८
——————————-
११ २४०९ ३०
——————————–
१२ २१८८ ३४
——————————-
१३ १८३८ ४१
——————————-
१४ १५१७ ४५
———————————
१५ २५२९ ५४