कोरोना बाधित लहान मुलांना सौम्य लक्षणे, महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन 43 मुले संसर्गमुक्त

0
300

लहान मुलांचीही होम आयसोलेशनलाच पसंती

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 472  मुलांना आजपर्यंत कोरोनाची लागण असून महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात दाखल झालेल्या 50 मुलांपैकी 43 मुलांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजमितीला 7 मुले रुग्णालयात दाखल आहेत. मुलांमध्ये सर्दी, ताप अशी सौम्य लक्षणे असून अनेक मुले घरीच उपचार घेत आहेत.  

कोरोनाच्या मागील दोन लाटेच्या तुलनेत तिस-या लाटेत मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात 1 ते 13 जानेवारीपर्यंत 1 हजार 472  मुलांना कोरोनाची लागण झाली. मुलांना सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. महापालिकेने लहान मुलांसाठी नवीन जिजामाता रुग्णालयात राखीव ठेवले आहे.

राखीव ठेवलेल्या नवीन जिजामाता रुग्णालयात आजपर्यंत 50 मुले दाखल झाली होते. त्यातील 43 मुले कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आता फक्त 7 मुले उपचाराधीन आहेत आणि त्यांनाही सौम्य लक्षण आहेत. उर्वरित मुले गृह विलगीकरणात असून अनेकांनी तर कोरोनावर यशस्वीपणे मात देखील केली आहे. मुलांना लक्षणे दिसताच पालकांनी रुग्णालयात घेऊन यावे आणि कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.