कोरोना चाचणी कऱणाऱ्या प्रयोगशाळेलाच आग

0
478

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – दक्षिण दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश भागातल्या एका खासगी पॅथॉलॉजी लॅबला आज आग लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या लॅबमध्ये इतर तपासण्यांसोबतच दररोज १ हजाराहून अधिक करोना चाचण्या केल्या जात होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलाश भागातल्या एस ब्लॉकमधल्या भसीन लॅबला आज आग लागली. सकाळी साडे दहाच्या आसपास या आगीविषयीची माहिती मिळाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

या आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या लॅबच्या स्टाफला या आगीतून बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले आणि मग ही आग आटोक्यात आली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी सांगितलं, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांच्या तत्परतेमुळे या लॅबच्या स्टाफचे आणि तिथे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं.