कोरोना चाचणीत भारत अव्वल

0
429

वॉशिंग्टन, दि. १७ (पीसीबी) : फक्त एका ठराविक देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. जगात सर्वात जास्त कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत. आता पर्यंत अमेरिकेत ४.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर सर्वाधिक नमुन्याची चाचणी करण्याच्या यादीत अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागतो. व्हाईट हाऊसने यासंबंधी माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत १.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

अमेरिकेत ३५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास १ लाख ३८ हजार रुग्णांनी कोरोना व्हायरसमुळे आपले जीव गमावले आहे. संपूर्ण जगात १३.६ कोटीपेक्षा जास्त नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ५ लाख ६८ हजार रुग्णांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे.

व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव मॅकेन्नी यांनी गुरुवारी सांगितले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ४.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून भारतात ही संख्या १.२ ऐवढी आहे. त्यामुळे तपासाच्या बाबतीत आपण संपूर्ण जगाचे नेतृत्व करीत असल्याचे देखील ते म्हणाले.

अमेरिकेत गेल्या २४ तासात ६८ हजार ४२८ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३५ लाख ६० हजार ३६४ वर पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळत आहे.