कोरोना गेलेला नाही, अजूनही सतर्क रहा – पंतप्रधान नरेंद मोदी

0
251

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) :गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते देशवासियांशी संबोधित करत होते.

देशातील नागरिकांना संबोधीत करताना ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोना विरोधातील लढाईत सर्व भारतवासींना मोठा प्रवास केला. आता आमच्या पैकी अधिकांश लोक जीवनाला गती देण्यासाठी रोज घराबाहेर पडतात. सणासुदिच्या दिवसांमुळे आता बाजारात पुन्हा गती येते आहे. पण आम्हाला हे विसरून चालणार नाही की लॉकडाऊन भले गेला आहे, पण व्हायरस गेलेला नाही.

मोदी म्हणाले, भारत आज कोरोनाबाबत संमलीत स्थितीत आहे. त्याला आपणाला बिघडवून द्यायचे नाही. आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. प्रति १० लाख लोकांत ५५०० हजीर लोकांना कोरोना आहे, तर दुसरीकडे सर्वांत प्रगत अशा अमेरिका, ब्राझिलमध्ये हेच प्रमाण २५ हजार आहे. आपल्याकडे मृत्यू दर ८३ तर विदेशात तो आकडा ६०० च्या पुढे आहे. जगातील साधन संपत्ती असलेल्या या देशात आपण अधिकाअधिक लोकांचे जीव वाचविण्यात यशस्वी झालो आहोत. आज आपल्याकडे ९० लाखापेक्षा अधिक बेडची सोय आहे. १२ हजार क्वारंटाईन सेंटर आहेत. १० कोटींपर्यंत चाचण्या झाल्या आहेत. सेवा परमो धर्म हा मंत्र घेऊन डॉक्टर, हेल्थ वर्कर निस्वार्थी सेवा करतात. याची दखल घेऊ, पण ही वेळ आता बेफिकीर राहण्याची नाही. कोरोना गेला, आता त्याचा धोका नाही असे समजू नका.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही व्हिडीओ पाहिलेत, त्यात लोक बिनामास्क आहेत. त्यातून आपण आपल्या कुटुंबाला संकटात टाकत आहात हे लक्षात ठेवा. आज अमेरिका अथवा युरोप सारख्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना कमी होतो आहे, पण चिंताजनक स्थिती आहे. मात्र, जोवर लस येत नाही तोवर आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोनाची लस आली की ती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी काम सुरू आहे. आता सुरू असलेल्या सणासुदिच्या दिवसांत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. माध्यमांचे साथीदार यांना सांगतो, जागृत रहा, जनजागरण करा ही आपल्याकडून देशसेवा होईल, असे ते म्हणाले. भाषणाच्या अखेरिला त्यांनी देशातील नागरिकांना नवरात्र, दसरा, इद, दिपावली, छटपूजा, गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.