Desh

कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही – पंतप्रधान

By PCB Author

April 20, 2020

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही, अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

कोरोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. कोरोना लागण होतोना कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही त्यामुळे कोरोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली असून त्यामधून कोरोना संकट आणि त्याच्याशी सामना करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

दरम्यान, भारतातून येणाऱ्या नव्या संकल्पना संपूर्ण जगासाठी समपर्क असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये फक्त भारतच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी सकारात्मक बदल करण्याची क्षमता असली पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.