Desh

‘कोरोना काळातील मोदींचे प्रयत्न वरवरचे आणि दिखाऊ नाहीत’ – रतनजी टाटा

By PCB Author

December 19, 2020

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठे उद्योजक रतनजी टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांची तारीफ केली आहे. टाटा म्हणालेत कि, ‘सध्याच्या करोना महामारीच्या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत,’ असं असोचेम फाउंडेशन वीकच्या संमेलनात ते बोलत होते.

“मी आजवरच्या व्यावसायिक कार्यकाळात साथीच्या आजाराची सर्वात भयनाक परिस्थिती यंदा पाहिली. महामारीचा काळ आणि देशाची आर्थिक पातळीवर घसरण झालेली असताना पंतप्रधानांनी केलेल्या कार्याचा मला आदर वाटतो. कारण या काळात तुमचे नेतृत्व अढळ राहिले, तुम्ही दुजाभाव केला नाही, तुम्ही जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत, तुम्ही पुढे राहून देशाचे नेतृत्व केले.”असं रतन टाटा म्हणाले. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची देशातील एका बड्या उद्योजकानं दुसऱ्यांदा दखल घेतली आहे. यापूर्वी आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मोदींचे करोना काळातील नेतृत्वाचे आणि कामाचे कौतुक केले होते.

रतन टाटा म्हणाले कि, “तु्म्ही लॉकडाउन लागू केला, काही मिनिटांसाठी तुम्हाला देशानं दिवे बंद करावे असं वाटत होतं. तुम्ही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामध्ये वरवरचं वाटणं आणि दिखाऊपणा नव्हता, देशानं एकत्र यावं हाच यामागील उद्देश होता. या नेतृत्त्वाचे फायदे दाखवून देणे हे आता उद्योग म्हणून आपलं काम आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही असे करुन दाखवू. गेल्या काही वर्षांत मी पाहिले आहे की, आपण एकत्रित एकत्र येत असताना प्रचंड गोष्टी करतो. त्यामुळे या कठीण काळात जर आपण सर्वजण एकत्र उभे राहिलो आणि आपण मोदींनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागलो तर जग म्हणेल की या पंतप्रधानांनी जसं सांगितलं तसं घडून आलं,” अशा शब्दांत रतन टाटा यांनी पंतप्रधान मोदींच कौतुक केलं.