कोरोना आपले रुपडे पालटतोय का ?

0
251

लंडन, दि. २५ (पीसीबी) : कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तर अनेक जण हा व्हायरस नेमका आहे काय? काळानुसार तो किती घातक होतो? यांसारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी कोरोनावर केलेल्या संशोधनातून एक खास गोष्ट समोर आली आहे. संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे काही उत्परिवर्तन मानवाच्या रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित काही प्रोटिन्सशी दिशा-निर्देशित असतं. हे प्रोटीन्स त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करतात. परंतु, कोरोना व्हायरस यांच्या विरोधात पुन्हा प्रभावी होतो. संबंधित संशोधन कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ब्रिटनमधील युनिवर्सिची ऑफ बाथचे संशोधक एलन राइस यांच्यासह संशोधनात सहभागी असलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे की, जेव्हा सजीवांमध्ये उत्परिवर्तन घडते, तेव्हा ही प्रक्रिया आकस्मिक असते. उत्परिवर्तन म्हणजेच, सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल.

जगभरात 6 हजारांहून अधिक उत्परिवर्तनांची ओळख पटवण्यात आली
संशोधनात सांगण्यात आलं आहे की, कोरोना विषाणूच्या बाबतीत, उत्परिवर्तन प्रक्रिया अपघाती होऊ शकत नाही. तसेच मानवी शरीरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाला कमकुवत करण्यासाठी संरक्षक कवच म्हणून उत्परिवर्तनाची प्रक्रिया घडत आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित हे संशोधन ‘मॉलीक्यूलर बॉयलॉजी अँड इवोल्यूशन’मध्ये छापण्यात आलं आहे. संशोधनासाठी वैज्ञानिकांनी जगभरातील 15 हजारांहून अधिक व्हायरस जीनेमचा अभ्यास करून निरिक्षणं नोंदवली आहेत. तसेच यामध्ये त्यांनी 6 हजारांहून अधिक उत्परिवर्तनांची ओळख पटवली आहे. निवर्सिची ऑफ बाथमधील मिलनर सेंटर फॉर इवोल्यूनचे निर्देशक लॉरेंज हर्स्ट यांनी या संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, ‘आम्ही व्हायरसचं उत्परिवर्तन करून यावर हल्ला करत आहोत.’
संशोधकांना संशोधनात आढळून आलं की, ‘उत्क्रांतीच्या क्रमात नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, कोरोना व्हायरस उत्परिवर्तन प्रक्रियेच्या विरोधात पुन्हा लढा देण्यास प्रभावी होतो. त्यामुळे हे संशोधन कोविड-19च्या विरोधात नवी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.