कोरोनासोबत जपानमध्ये बर्ड फ्लूचा झाला उद्रेक; संसर्ग झालेल्या ११ लाख कोंबड्यांना मारण्याचा जपान सरकारचा निर्णय

0
430

जपान, दि.२५ (पीसीबी) : कोरोना पाठोपाठ आता जपानमध्ये ‘बर्ड फ्लूने’ चांगलंच थैमान घातलंय. त्यामुळे या विषाणूचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी जपानने तातडीने तब्बल ११ लाख जिवंत कोंबड्यांना मारण्याचा कठोर निर्णय घेतलाय. कारण जपानमधील अनेक भागांमध्ये ‘बर्ड फ्लू एच फाइव्ह’ चा प्रसार वेगाने झाला आहे. आणि हा विषाणू अजून पसरु नये म्हणून जपान सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

या विषाणूमुळे अनेक भागांमध्ये ‘बर्ड फ्लू एच फाइव्ह’चा प्रसार झाला आहे. आता जगभर कोरोनाच्या नव्या विषाणूची चिंता असतानाच जपानमध्ये ‘बर्ड फ्लू’ हळूहळू आपलं जाळ पसरवू पाहतोय. त्यामुळे या ‘बर्ड फ्लूचा’ धोका वेळीच लक्षात घेता जपानमधील चीबा प्रांतामध्ये ११ लाख कोंबड्यांना मारलं जाणार आहे. चीबा हा जपानमधील १३ वा असा प्रांत आहे जिथे ‘एच फाइव्ह हा बर्ड’ फ्लू वेगाने पसरला आहे. त्यामुळे वेळीच याची भयानकता लक्षात घेता या विषाणूचा उद्रेक होण्याआधीच जपानमधील अधिकाऱ्यांनी लगोलग चीबामधील १० किमीपर्यंतचा परिसर क्वारंटाइन केला असून या ठिकाणी कोंबड्या आणि अंडी न पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार थांबवण्यासाठी जपानने ११ लाख ६० हजार कोंबड्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

चीबा प्रांता शिवाय कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओइता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचि या प्रांतांमध्येही बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रसार वाढत चालल्यामुळे जपानमध्ये आतापर्यंत तब्बल ३४ लाख कोंबड्यांना संपवण्यात आलं असून फक्त जपानच नाही तर मागच्या काही महिन्यांमध्ये अशाप्रकारे बेल्जियम, ब्रिटन, नेदरलँड्स आणि उत्तर जर्मनी, मध्येही अशाच प्रकारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता.

त्यामुळे हा संसर्ग झालेल्या कोंबडीची अंडी किंवा मांस खाल्ल्यास बर्ड फ्लूचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो शिवाय या फ्लूचा प्रसार एका प्राण्याकडून दुसऱ्याकडे होत असला तरी हा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामधून करोनासारखी परिस्थिती निर्माण होईल या यासंदर्भात जगभरातील तज्ज्ञ मंडळी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या फ्लू चा प्रसार जंगलातील पक्षांमधून पोल्ट्रीमधील पक्षांमध्ये झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. बर्ड फ्लू विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे.

जपानमधील पोल्ट्रींमध्ये ज्या कोंबड्या आहेत त्यांच्या एकूण संख्येपैकी एक चतुर्थांश कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कोंबड्या संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय जपान सरकारजवळ नाहीये. त्यामुळे जपानने या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टीम तैनात केल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असतानाच त्यात आता बर्ड फ्लूची भर पडल्याने चिंता आणखी वाढत चालली आहे. कारण, संपूर्ण जगभरामध्ये करोनामुळे १७ लाख ३९ हजारांहून अधिक लोक दगावलेत. आणि त्यात आता हि बर्ड फ्लू ची भर पडल्याने भीतीच वातावरण पसरत आहे. त्यामुळे ‘भय इथले संपत नाही’, अशी परिस्थिती संध्या संपूर्ण जगासमोर आहे.