“कोरोनाशी सामना कसा करावा, हे जगाने पाकिस्थानकडून शिकावे”

0
686

इस्लामाबाद,दि.१३(पीसीबी) – कोरोनाशी सामना कसा करावा, हे जगाने पाकिस्थानकडून शिकावे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस यांनी म्हटलं आहे. पाकिस्तातने कोरोनाशी सामना करण्यासाठी अवलंबलेल्या रणनितीचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतूक करत सर्व जगाने पाकिस्तानकडून शिकावं, असं म्हटलं आहे.

घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओची लस देणाऱ्या पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचं जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस यांना कौतूक केलं आहे. पाकिस्तानने याच आरोग्य साखळीच्या आधारे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेल्यांचा आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केला. त्यामुळेच त्यांच्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आली असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या टेड्रोस यांनी कौतूक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी विशेष सहाय्यक डॉ. जहर मिश्रा यांनीही पाकिस्तानंच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतूक झालं असल्याचं सांगितलं.