कोरोनामुळे ‘हे’ उपमुख्यमंत्री आयसीयू मध्ये

0
228

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 48 वर्षीय मनिष सिसोदिया यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना बुधवारी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या लोकनायक जयप्रकाश रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

14 सप्टेंबर रोजी सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते घरीच आयसोलेशनमध्ये होते. मात्र शरीराचं तापमान वाढल्याने आणि ऑक्सिजन लेवल खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या महिन्याच्या सुरवातीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पॉझिटिव्ह सापडले होते. याचबरोबर केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.