कोरोनामुळे पर्यावरणवादी विकास पाटील यांचे निधन

0
520

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पर्यावर संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय 63) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृदयविकाराचा धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पाटील यांच्या निधनामुळे शहरातील पर्यावरण चळवळीची मोठी हानी झाली आहे.

चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण, पवना नदी सुधार, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत लॅपटॉप वाटप देखील केले होते. महापालिका शाळांतून पर्यावरण विषक विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती कायमच्या बंद कराव्यात यासाठी गेले तीन वर्षे ते शासनाकडे मागणी करत होते. शहरातील विविध पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या संस्था संघटनांना एकत्र करण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. पालिकेच्या निवडणुका, राष्ट्रीय कार्यक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वृक्षसंवर्धन यासारख्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांनी पत्रकारितेची पदवी देखील घेतली होती.