Videsh

कोरोनामुक्त ‘न्यूझीलंडला’ पुन्हा कोरोनाने घेरलं; ९० दिवसानंतर सापडले ४ कोरोनारुग्ण

By PCB Author

August 12, 2020

नवी दिल्ली,दि.१२ (पीसीबी) : कालपर्यंत जगात चर्चा होती कि, ‘न्यूझीलंड हे कोरोना मुक्त झाले आहे.’ परंतु, हा आनंद जास्त काळ टिकला नाही. हाती आलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये ९० दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी मंगळवारी सांगितले की, ‘ऑकलंडच्या एका कुटुंबात कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत. एका कुटुंबातील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षण आढळली. चाचणी केली असता ती व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. त्याच्याबरोबर राहणार्‍या इतर ६ जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये तीन लोकं ही पॉझिटिव्ह आले आहेत.’  यांना कोरोना संसर्ग कुठे आणि कसा झाला? याचा तपास चालू आहे.

पंतप्रधान जसिंडा अर्डर्न म्हणाल्या कि, ‘न्यूझीलंडमधील ऑकलंड या सर्वात मोठ्या शहराला बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवार रात्रीपर्यंत अर्लटवर ठेवण्यात येतंय. लोकांना घरीच राहण्याच सांगण्यात येईल. बार आणि इतर अनेक व्यवसाय यावेळी बंद राहतील. त्यासाठी कडक नियम हि असतील.’

‘या तीन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन संसर्गाची माहिती काढण्यात येईल. आणि पुढची परिस्थिती आत्ताच आटोक्यात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. तसेच या दरम्यान कोणत्याही कार्यक्रमासाठी १०० लोकांचीच उपस्थिती मर्यादित असेल आणि त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे कटाक्षाने करण गरजेचं राहील.’ असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न म्हणाल्या.