कोरोनाच्या भितीने अंत्यसंस्काराला कोणी नाही, अखेर पत्नीनेच हातगाडीवर पतीचा मृतदेह स्मशानात नेला

0
401

बेळगाव, दि. १८ (पीसीबी) – कोरोनामुळे माणूस माणुसकी हरवून बसला आहे. त्याचे एक उदाहऱण बेळगाव जिल्ह्यातील आथणी गावात पहायला मिळाले. रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी, नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची दुर्दैवी घटना बेळगावातील अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चार जण लागतात पण चार लोक देखील कोरोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (५५) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी ,नातेवाईक यांना समजली. शेजारी,नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. मृतदेह तिथेच राहिला. शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला.मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली.हातगाडीत त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला. नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

महाराष्ट्रात अनेक शहरांत आता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्काराची समस्या पुढे आली आहे. अनेक ठिकाणी नातेवाईक पुढे येत नाहीत. नाशिक शहरात शेजारच्या मुस्लिम कुटुंबाने हिंदूवर हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. पुणे शहरात ससून मध्ये मृत झालेल्या अनेकांवर अंत्यसंस्काराचा काम कंत्राटी शासकीय कर्मचारी करतात. मुंबईतसुध्दे तेच चित्र आहे.