Others

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ भागात अभिनेते प्रशांत खिलारे यांच्या वतीने अन्नदान

By PCB Author

April 08, 2020

मावळ,दि.८(पीसीबी) – राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस अभिनेते प्रशांत खिलारे यांनी कोरोनाच्या भयंकर अशा पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील अनेक भागात अन्नदान केले.

मावळ तालुक्यातील वडगाव (ठाकर वस्ती), जांबवडे, कान्हे आणि नायगाव लगतच्या वाडी वस्तीवर स्वतः जाऊन तेथील नागरिकांना अन्नदान केले. तसेच माळीनगर मधील अनेक गरजू कुटुंबीयांना मदत म्हणून अन्नधान्य वाटप केले.

आपण समाजाचे काही देणे लागतो अशी मनोभावना ठेवून कामशेत ते देहूरोड पर्यंतच्या सर्व कष्टकरी आणि हातावरती पोट असलेल्या नागरिकांची खिलारे यांनी स्वखर्चातून अन्नदानातुन सेवा केली आहे.

दरम्यान, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि याची आता कष्टकरी आणि हातावरती पोट असलेल्या जनतेला गरज आहे, त्यामुळे कोरोनाच्या या दुःखात एक सुखाचा घास मिळावा आणि त्यामुळे लोक थोड्याफार प्रमाणात बाहेर पडणार नाहीत म्हणून एक मदतीचा हात मी दिला आहे, असं प्रशांत खिलारे यावेळी म्हणाले.