कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निलम पाटील यांची उचलबांगडी चाकण मुख्याधिकारी पदावर नानासाहेब कामठे

0
381

चाकण, दि. ७ (पीसीबी) – चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर असलेल्या निलम पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर गंगाखेड नगरपरिषद (जि.परभणी) येथे कार्यरत असलेले नानासाहेब कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड लक्षात घेऊन त्याबाबात उपाय योजनेचा भाग म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत. निलम पाटील यांना कार्यमुक्त कऱण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमीत करण्यात येतील असे नगरविकास विभागाचे अवर सचिव सचनि सहसत्रबुध्दे यांनी काढले आहेत. नानासाहेब पाटील यांनी तत्काळ पदावर रुजू व्हावे असे आदेशात म्हणटले आहे.