Maharashtra

‘कोरोनाच्या परिणामांबद्दल अंदाज बांधण्यात सरकार अपयशी’

By PCB Author

May 12, 2021

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – “कोरोनाची पहिली लाट ओसरत होती तेव्हाच कोरोनाचे उच्चाटन होण्यास सुरुवात झाली आहे, असं विधान देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी मार्चच्या सुरूवातीस केलं होतं. कोरोना प्रादुर्भाव आणि त्याच्या परिणामांबाबत अंदाज बांधण्यास सरकार अपयशी ठरलं,” अशी टीका नोबेलविजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत बॅनर्जी यांनी केली.

बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, पश्चिम बंगालची निवडणूक या विषयांवर भाष्य केलं. केंद्र सरकारने लशींची आयात करून जनहितासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणं आवश्यक आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांऐवजी एका टप्प्यात निवडणूक झाली असती तर बरं झालं असतं. प्रचारसभांमुळे कोरोना नियमांचं उल्लंघन झालं, असं निरीक्षण बॅनर्जी यांनी म्हटलं.