कोरोनाच्या दहशतीने पोलीस मामा हादरले; राज्यात ७१४ पोलिस कोरोना बाधीत, पाच मृत्यू

0
449

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्रातील पोलीस खात्याचे तब्बल ७१४ पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोना वाधीत झाल्याची धक्कादायक माहिती शासनाने जाहिर केली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा अहोरात्र बंदोबस्तात अडकलेली आहे. संचारबंदी असताना रस्त्यावर भटकणाऱ्या तब्बल एक लाख दोन हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, किमान ५० हजारावर वाहने जप्त केली. सलग दीड महिना पोलीस रस्त्यावर असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.

कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करताना त्यात नकळत एखादा कोरोना बाधीत असतो आणि त्यातूनच पोलीस बाधीत होत असल्याचे दिसले. ७१४ पैकी ८१ अधिकारी आणि ६३३ पोलीस कर्मचारी बाधीत आहेत. ६१ पोलीस बरे होऊन घरी आले. दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या या दहशतीमुळे बंदोबस्तावर असलेल्या तमाम पोलीस बांधवांनी चांगलात धस्का घेतला आहे.