कोरोनाचे संकट कमी होतं असताना आर्थिक घडी सुधारणे गरजेचे – आ. चंद्रकांतदादा पाटील

0
194

– महिलांना स्वावलंबी करण्याच्या पतित पावन संघटनेच्या कार्याला सक्रिय सहकार्य करणार

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पतित पावन संघटनेने वस्ती विभागातील भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे व नवनवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्याचे काम हाती घेतले आहे ते अत्यन्त महत्त्वाचे असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोरोना चे संकट आता कमी होतं असताना विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसविणे गरजेचे असूना विशेषतः वस्ती विभागातील भगिनींना उत्पन्नाचे नवनवे स्रोत उपलब्ध करून दिले पाहिजेत असेही ते म्हणाले. मी आज प्रतिनिधिक स्वरूपात पतित पावन संघटनेच्या माध्यमातून भगिनींना व्यवसाय सुरु करण्यासाठी शिलाई मशीन भेट देत आहे मात्र आपण अजूनही सकारात्मक विषय सांगितल्यास मी सर्वतोपरी मदत करेन असे ही चंद्रकांतदादा म्हणाले. पतित पावन संघटनेच्या भावी वाटचालीस सहकार्य करण्याचे वचन ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. कोथरूड मधील जयभवानी नगर येथे पतित पावन संघटनेचे कोथरूड मंडल अध्यक्ष सुनील मराठे यांनी आयोजित केलेल्या शिलाई मशीन वाटप व शिधा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरोनाचे संकट कमी होतं असताना आर्थिक घडी सुधारणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

महिलांना स्वावलंबी करण्याच्या पतित पावन संघटनेच्या कार्याला सक्रिय सहकार्य करणार, अशी ग्वाही आमदार. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पतित पावन संघटनेने वस्ती विभागातील भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे व नवनवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्याचे काम हाती घेतले आहे ते अत्यन्त महत्त्वाचे असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोरोना चे संकट आता कमी होतं असताना विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसविणे गरजेचे असूना विशेषतः वस्ती विभागातील भगिनींना उत्पन्नाचे नवनवे स्रोत उपलब्ध करून दिले पाहिजेत असेही ते म्हणाले. मी आज प्रतिनिधिक स्वरूपात पतित पावन संघटनेच्या माध्यमातून भगिनींना व्यवसाय सुरु करण्यासाठी शिलाई मशीन भेट देत आहे मात्र आपण अजूनही सकारात्मक विषय सांगितल्यास मी सर्वतोपरी मदत करेन असे ही चंद्रकांतदादा म्हणाले. पतित पावन संघटनेच्या भावी वाटचालीस सहकार्य करण्याचे वचन ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. कोथरूड मधील जयभवानी नगर येथे पतित पावन संघटनेचे कोथरूड मंडल अध्यक्ष सुनील मराठे यांनी आयोजित केलेल्या शिलाई मशीन वाटप व शिधा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरोनाचे संकट कमी होतं असताना आर्थिक घडी सुधारणे गरजेचे असल्याचे आमदार चंद्रकांतदादा पाटील मत त्यांनी व्यक्त केले.