कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खडकी, मोशी,उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून राहणार बंद

0
372

 

पुणे, दि.१० (पीसीबी) – पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार सह खडकी, मोशी,उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत.

या सर्व मार्केट मधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.