कोरोनाचा ‘आयपीएल’ला दणका! सर्व सामने तात्पुरते स्थगित; ‘खेळाडूंच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही’- BCCI

0
232

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : कोरोना जगभरात थैमान घातलं असताना आता काल सोमवारपासून आयपीएलच्या १४व्या हंगामावर आयपीएल वरती कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी अखेर बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कारण, कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली त्यानंतर लगेच चेन्नई सुपर किंग्जमधील सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरनाची लागण झाली होती. या पाश्वभूमीवर बीसीसीआयने कालची कोलकाता आणि बेंगळुरू आणि आज होणारी चेन्नई आणि राजस्थान ही मॅच सुद्धा लगोलग थांबवली. दरम्यान बीसीसीआय आयपीएलचे सामने मुंबई खेळवणार असल्याचं बोललं जातंय. पण त्याविरोधात देखील मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

देशात गेल्या काही दिवसात देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणाऱ्यांना करोना झाल्याने काळजी वाढली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. स्पर्धा पुन्हा कधी होणार याचा आम्ही विचार करतोय. पण सध्या तरी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरना झाल्याचे समोर आले होते. तर मंगळवारी सकाळी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज आणि विकेटकिपर वृद्धीमान सहा याला देखील करोना झाल्याचे आढळले. हैदराबाद संघातील तो एकमेव खेळाडू आहे ज्याला करोनाची लागण झाली आहे. अन्य खेळाडूंची टेस्ट नेगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या माहितीनुसार फक्त वृद्धीमान सहाला करोनाची लागण झाली आहे. पण संपूर्ण संघाला आयसोलेट करण्यात आले आहे. अन्य खेळाडूंची करोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे.