कोरोनाग्रस्त अर्थर रोड जेलचे अधीक्षक एन.बी.वायचळ यांची अखेर बदली

0
310

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) : अर्थर रोड जेलमध्ये आरोपींना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने जेलचे अधीक्षक एन. बी. वायचळ यांची बदली करण्यात आली आहे. जेलमध्ये सुमारे 200 च्या वर कैदी आणि जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

जेलमध्ये कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. एक ही नवा कैदी अर्थर रोड जेलमध्ये न घेण्याचा निर्णय झाला होता. नव्या आरोपी मार्फत कोरोना जेलमध्ये प्रवेश करू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. असे असूनही जेलमध्ये आज मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

जेलमध्ये ही लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र, सर्व सुरक्षा उपाय योजना करूनही अखेर कोरोना जेलमध्ये पोहचला. एका कैद्यांमार्फत कोरोना अर्थर रोडमध्ये पोहचला. यावेळी सुमारे 200 च्या वर कैदी आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली. यामुळे आख्या जेलच्या पॉलिसीत बदल करण्यात आला आहे.

अर्थर रोडमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने याबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर अर्थर रोड जेलचे अधीक्षक एन. बी. वायचळ यांच्यावर टीका झाली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र, आता त्यांना अर्थर रोड जेलच्या अधीक्षक पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी जे. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जे. एस. नाईक यांची तळोजा जेलमध्ये असलेल्या उजळणी पाठयक्रमाचे प्राचार्य आहेत. वायचळ हे आजारी असल्याच्या कारणास्तव त्यांची बदली करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.