कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोशी गाव चार दिवस बंद

0
450

मोशी, दि.९(पीसीबी) – देशांबरोबरच पुणे शहरातील कोविड १९ (कोरोना) विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली संचार बंदी पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून अधिक कडक करण्यात आली असून पालिका हद्दीतील मोशी गावातील जवळपास च्या गावांमध्येही कोरोना रुग्ण आढळल्याने दि.१० एप्रिल रात्री १२ वाजल्यापालुन मोशी गाव दि. ११, १२,१३ व १४ एप्रिल पर्यंत ४ दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

बंद मध्ये भाजीपाला, किराणा माल, दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत याची सर्व नागरिक व व्यापारी, दुकानदार यांनी नोंद घ्यावी तरी सर्व दुकानदार, नागरिक यांनी याची नोंद घ्यावी.

पोलीस प्रशासनास सहकार्य करावे सर्वानी घरात राहावे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.