Maharashtra

“कोरेगाव-भीमा प्रकरणाची माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव”

By PCB Author

February 16, 2020

जळगाव,दि.१६(पीसीबी) – रविवारी जळगाव दौऱ्यावर असताना झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा हिंसचार प्रकरणाची माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, अस वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, कायद्यामध्ये केंद्र सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे मान्य आहे. पण राज्याची संमती घेण्याची पद्धत आहे. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. हा प्रकार घडला तेव्हा फडणवीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल, म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला, असा आरोपही यावेळी यांनी केला.

दरम्यान, एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे विषय वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देणं म्हणजे त्यांना काही गोष्टी लपवाच्या झाकायच्या आहेत. सत्य बाहेर येण्याची भीती तत्कालीन सरकारला असावी. दिल्लीच्या सरकारने मदतीला येत हे प्रकरण काढून घेतलं. हे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.