कोरेगाव पार्क येथील हुक्का पार्लरवर छापा; हुक्का ओढणाऱ्या २० जणांवर खटले दाखल

833

पुणे, दि. १७ (पीसीबी) – कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील हॉटेल डार्क हॉर्स येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करुन हुक्का ओढणाऱ्या एकूण २० जणांवर खटले दाखल केले आहेत़. ही कारवाई कोरेगाव पोलीसांनी मंगळवारी (दि.१६) दुपारी सव्वाएकच्या सुमारास केले.

हॉटेल मालक प्रदीप प्रकाश परदेशी (रा़. माऊली निवास, बर्निंग घाट, कोरेगाव पार्क) आणि मॅनेजर सूरज पिटर थापा (रा़. कोरेगाव पार्क) असे कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पोलीसांना त्यांच्या खबऱ्याकडून हॉटेल डार्क हॉर्स येथे हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाली होती. यावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास हॉटेलवर छापा मारला त्यावेळी हॉटेलमध्ये कोणतीही अग्निशामक यंत्रणा नव्हती़ कामगार हे निखारे हुक्का पॉटचे चिलीमवर ठेवत असताना दिसले़. या ठिकाणी १९ ते २५ वयोगटातील १२ तरुण व ९ तरुणी हुक्का ओढत असताना सापडले़ त्यांच्यावर खटले भरण्यात आले असून हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हे दाखल केले आहेत़. कोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.