कोरेगावमूळ येथे ६ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार

0
654

हवेली, दि. २२ (पीसीबी) – हवेली तालुक्यातील कोरेगावमूळ येथे एका ६ वर्षीय चिमुकलीवर घरा शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगावमूळ येथे आरोपी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा पीडित ६ वर्षीय चिमुकलीच्या घरा शेजारीच राहतो. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या मुलाने चिमुकलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने घटलेला प्रकार आईला सांगितला. आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शारीरिक चिकित्सा करण्यात आल्यानंतर अल्पवयीन मुलाविरोधात बालात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.  त्याला बाल न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.