Others

‘कोरफडीचा गर’ खाण्याचे हे आहेत आयुर्वेदिक फायदे…

By PCB Author

December 23, 2020

आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेली कोरफड औषधी म्हणून खूप उपयुक्त होते. ज्याच्या सेवनामुळे आपण आजन्म निरोगी राहू शकतो. फक्त कोरफड खाण्याची योग्य पद्धत आपल्याला माहिती हवी.. कारण प्रमाणापेक्षा जास्त किंवा चुकीच्या पद्धतीने आपण तिचे सेवन केल्यास तिचे दुष्परिणाम दिसू शकतात… 

१. कोरफडीचा गर खाल्यास दातदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होते.

२. तसेच पोटदुखी, अपचन, उलटी, गॅस, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या वरती कोरफडीचा ज्यूस              उपयुक्त ठरतो.

३. थंडीमध्ये कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या भरून काढते.

४. कोरफडीचा गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे        त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास                अपचनाचा त्रास कमी होतो.

५. कोरफडीच्या गर एका ठराविक प्रमाणात नियमित खाल्याने डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रोल, हायपरटेंशनसारख्या      गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही.

६. कोरफडीचा गर आणि थोडसं मध मिसळून त्याच चाटण करून थोडं थोडं सेवन केल्यास पोटातील आगीपासून     आणि छातीतील जळजळीपासून लगेचच सुटका होईल.

७. कोरफडीचा गरात साखर मिसळून रुग्णाला चाटण म्हणून दिल्यास कोणत्याही प्रकारची पोटदुखी बारी होते.

८. स्वयंपाकघरात काम करताना किंवा इतर वेळी कधी त्वचा भाजल्यास कोरफडीचा गर त्यावर लावल्यास             त्वचेवरील जळजळ थांबते.

कोरफडीच्या सेवनाचे हे फायदे जरी असले तरी कोरफड सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या कारण, लहान मुले, मध्यमवर्षीय व्यक्ती, गरोदर-स्त्री, पुरुष यांच्यासाठी कोरफड सेवनाची एक ठराविक मर्यादा असते. जर प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.