Pune

कोथरूडच्या मतदारांवर अन्याय करून निवडणूक लढवतोय – चंद्रकांत पाटील  

By PCB Author

October 06, 2019

पुणे, दि. ६ (पीसीबी) –  कोथरूडच्या विद्यमान भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरूडच्या मतदारांवर अन्याय करून मी विधानसभा  निवडणूक लढवत आहे, असे भाजपचे कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील  बालेवाडी-बाणेरमधील ‘कंफर्ट झोन’ सोसायटीत  प्रचारासाठी  आले होते. त्यावेळी ते बोलत होते.मेधा कुलकर्णींनीसह इतर लोकप्रतिनिधींनीही चांगले काम केले आहे. पण पक्षनेतृवाच्या इच्छेखातर मी निवडणूक लढवत आहे. तरी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट डावलून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पाटील यांना होणार विरोध मावळला आहे.