Lifestyle

कोण म्हणत कि, तूप खाल्ल्याने वजन वाढत म्हणून?

By PCB Author

January 19, 2021

सध्याच्या काळात प्रत्येक जण हेल्थ कॉन्शस झाला आहे. त्यामुळे गोड पदार्थ किंवा तेलकट, तुपकट पदार्थ खाणं अनेक जण टाळतात. मात्र, तूप किंवा दुग्दजन्य पदार्थ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहेत. त्यामुळे त्याचा आहारात कायम समावेश करायला हवा. तूपामुळे वजन वाढतं किंवा स्थुलता येते असा अनेक जणांचा गैरसमज आहे. मात्र, तसं अजिबात नसून तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. त्यामुळे आहारात दररोज साजूक तुपाचा वापर केला पाहिजे.

तूप खाण्याचे हे फायदे नक्की वाचाच मग…

१. त्वचा तजेलदार होते.

२. पित्ताचा त्रास कमी होतो.

३. अन्नपचन सुरळीत होते.

४. वाताचा त्रास कमी होतो.

५. पचनक्रिया सुधारते.

६. डोळ्यांवरील ताण कमी होतो.

७. अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.