“कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही”

0
435

मुंबई,दि.२८(पीसीबी) – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी “राज्यघटनेनुसार सरकारचं कामकाज चालतं. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधाना पेक्षा मोठं होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही” असं म्हटलं आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार तपासाबाबत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल तर राज्य सरकार बरखास्त होऊ शकतं, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. यावरून बाळासाहेब थोरात यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशोकराव चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधावरच चालेल, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.