कोणत्याही भीतीमुळे माढ्यातून माघार घेतलेली नाही – शरद पवार

0
470

पुणे, दि. ११ (पीसीबी) – माढ्यातून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय कोणत्याही भीतीने   जाहीर करत नाही. तर कुटुंबीयांशी झालेल्या चर्चेनंतर मी निर्णयापर्यंत आलो, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे स्पष्ट केले.

बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. बारामतीमधून सुप्रिया सुळे तर मावळ मतदार संघातून पार्थ पवार लोकसभा लढवतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पवार म्हणाले की, २०१४ मध्ये एक लाट होती, सध्याच्या घडीला कोणतीही लाट वगैरे काहीही दिसत नाही.  सध्या देशात सत्ता परिवर्तन होण गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.