कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल – चंद्रकांत पाटील

0
506

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजप आणि शिवसेना युती भक्कम आहे. कितीही धक्के बसले तरी काहीही फरक पडत नाही. युतीचे वैशिष्ट्ये असे आहे की कोणत्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल. काही पक्षांच्या निवडणुकीसाठी ५ वर्षांनंतर बैठका होतात. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीबाबत आशावाद व्यक्त केला आहे.

पाटील, म्हणाले की,  युती इतकी भक्कम आहे की, सौम्य काय किंवा तीव्र धक्के बसले तरी काहीही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील ते भरुन निघतील. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे काय म्हणणे आहे, ते तुम्ही छापा.   त्याचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होणार नाहीत, तर त्या वेगवेगळ्या होतील असे  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आम्ही स्वबळाची घोषणा केली आहे, शिवसेना प्रस्ताव घ्यायला बसलेली नाही, शिवसेनेशी जवळीक साधावे, असे सर्वांना हल्ली वाटत आहे. मात्र, शिवसेना येथे मुंडावळ्या लावून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही. आमचे मॅरेज ब्युरो नाही, प्रपोजल येतायेत. शिवसेना, शिवसेना आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रस्तावाला प्रत्युत्तर  दिले आहे.