Maharashtra

‘कोणतं दाबायचं?; मतदान केंद्रात राधाकृष्ण विखेंचा मिश्किल प्रश्न   

By PCB Author

April 29, 2019

अहमदनगर, दि. २९ (पीसीबी) –  ‘कोणतं दाबायचं?’  या काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मिश्किल सवालामुळे  मतदान केंद्रात मोठा हास्यकल्लोळ उडाला.  विखे पाटील यांनी आज (सोमवार)  त्यांच्या पत्नीसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला.  यावेळी विखे पाटलांनी उपस्थितांना प्रश्न केला.

विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये  प्रवेश करून दक्षिण नगरमधून  लोकसभा निवडणूक लढवली.  मुलगा भाजपत गेल्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर पक्षातील लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, विखेंनी अहमदनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती.

यावेळी विखे यांनी शिवसेना उमेदवारासाठी भाषणही केले. शिवसेना नेत्यांनी विेखेंना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे. तर भाजपवासी असलेले विखेंचे पुत्र सुजय विखे राधाकृष्ण विखे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.