कोकणात विध्वसंक प्रकल्प आणण्याचे सरकारचे प्रयत्न – राज ठाकरे

0
522

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – कोकणात विध्वसंक प्रकल्प आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावध राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे दिला.

मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ही भूमी आपली आहे. कोकणासारख्या पवित्र भूमीकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाकीचे येथे घुसले आहेत. आमचे लोक जमिनी विकून मोकळे होत आहेत. पण एकदा जमीन हातातून गेली की तुमचे अस्तित्व संपेल. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आपल्याला आपल्या भूमीचे महत्त्व समजलेले नाही. त्या जमिनीकडे तुम्हाला लक्ष द्यावच लागेल.

अनेक आमदार, खासदार तिथून आले. कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही, ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपले कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागते, असेही राज ठाकरे यांनी म्हणाले.