Maharashtra

कोकणातून मराठवाड्यात पाणी आणणार, मराठवाड्यातला दुष्काळ संपवणार- देवेंद्र फडणवीस

By PCB Author

September 07, 2019

औरंगाबाद, दि.७ (पीसीबी) – कोकणातून मराठवाड्यात पाणी आणणार, मराठवाड्यातला दुष्काळ संपवणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे केली. ६४ हजार किमीची पाईपलाईन उभारली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चार वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे तो दूर करण्याचं लक्ष्य सरकारपुढे आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतल्या मेट्रो मार्गांच्या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये औरिक सिटीचं उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. औरंगाबादमधून समृद्धी महामार्गही जातोय आहे या महामार्गामुळेही विकास होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांचंही कौतुक केलं. औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान महिला बचतगटाचं मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांची प्रशंसा केली.