कोंढव्यात उसने घेतलेले पैसे परत न केल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

0
572

पुणे, दि. २६ (पीसीबी) – उसने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून काही टोळक्यांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केले. तसेच डोक्यात दगड घालून खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये घडली.  

खडया ऊर्फ शाहरुख मनसुख हसन (१९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील फरशी मैदानाजवळ असणार्‍या शिवनेरी नगरमधील गल्ली क्रमांक नऊ मध्ये काल मध्यरात्री खडया ऊर्फ शाहरुख मनसुख हसन याचा काही व्यक्तीशी उसने घेतलेल्या पैशांवरुन वाद झाला. त्या दरम्यान तिघा चौघांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमी झालेल्या शाहरुख याला जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.