Desh

कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक- नरेंद्र मोदी

By PCB Author

September 20, 2019

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) –   देशी कंपन्यांसाठी असलेल्या कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मेक इन इंडियाला मोठी उभारी मिळेल असेही मोदी मिळाली. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची होण्याच्या वाटेतील अडथळे दूर झाले असल्याचेही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जगभरातून गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून खासगी क्षेत्रात चांगली स्पर्धा निर्माण होणार आहे. तसेच या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असून १३० कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावणार असल्याचे मोदी म्हणाले.

देशातील व्यापारवृद्धीसाठी योग्य स्थिती निर्माण होण्याच्या दृष्टीने, समाजातील सर्व वर्गांसाठी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने, भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या दृष्टीने गेल्या काही आठवड्यांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या घोषणा महत्त्वाच्या असल्याचे मोदी म्हणाले.

गेल्या सहा वर्षांपासून देशात असलेली मंदी, त्याच प्रमाणे देशातील बेरोजगारीचा बिकट झालेला प्रश्न लक्षात घेत सरकारने देशी कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. या मुळे मागणी आणि गुंतवणुकीत वाढ होऊ चीन आणि दक्षिण कोरियाच्या आर्थिक विकासाशी स्पर्धा करण्यास भारत सक्षम होईल असा सरकारला विश्वास आहे.