कॉमनवेल्थ जुदो चॅम्पिअनशिपमध्ये स्वाती नवले- देसाईला कास्य पदक   

0
555

  पुणे, दि. १७ (पीसीबी) – जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ जुदो चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये स्वाती नवले- देसाईने मास्टर गटात -७८ किलो वजनी गटात कास्य पदकाची कमाई करत चमकदार कामगिरी केली.

स्वाती सध्या इंटरनॅशनल स्कुल, विब्ग्योर हाय, एनआयबीएम येथे जुदो प्रशिक्षक या पदी कार्यरत आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्युझील्यांड, बोस्निया, जमैका, नायजेरिया, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, सिंगापूर, केनिया, मोझांबिक यासारख्या देशांनी सहभाग घेतला होता.

या यशाबद्दल इंटरनॅशनल स्कुल, विब्ग्योर हाय,  एनआयबीएमचे प्राचार्य, महाराष्ट्र जुदो संघटनेचे सचिव  दत्ता आफळे, पुणे जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष  महेश मते, सचिव  योगेश धाडावे, सहसचिव दीपक होले, जनार्दन देसाई, पंडित नवले आदींनी स्वातीचे अभिनंदन केले.