Maharashtra

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकमतझाल्याशिवाय शिवसेनेला पाठींबा नाही – अजित पवार

By PCB Author

November 12, 2019

महाराष्ट्रातील राजकारणात कालपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेला राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायचे होते. त्यासाठी दिवसभर मुंबई दिल्ली आणि जयपूरमध्ये बैठका सुरु होत्या. पण शिवसेनेला पाठींबा द्यायचा की नाही या निर्णयाप्रत काँग्रेस येऊ शकली नाही. त्यामुळे दिलेल्या वेळेत शिवसेनेला वेळेत बहुमत सिध्द करता आले नाही.

जो काही निर्णय होईल तो एकत्रितपणे होईल. यासाठी आम्ही सोमवारी काँग्रेसशी संवाद साधला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आम्ही एकटयाने हा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात काही गैरसमजही नाही. आम्ही एकत्रित लढलो होतो आणि अजूनही एकत्रितच आहोत,” अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिल्या.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा शक्य नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हा दोघांना एकमताने निर्णय घ्यावा लागेल. सोमवारी आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. पण त्यांचे आमदार जयपूरमध्ये आम्ही इकडे, त्यामुळे लवकर संवाद होत नाही. काँग्रेस सोबत आलीच तरच मार्ग निघू शकतो. असेही ते यावेळी म्हणाले.