केशवनगर येथे मधुकर बच्चे युवा मंचाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

0
634

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – चिंचवड, केशवनगर येथे मधुकर बच्चे युवा मंचाच्या वतीने राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करण्यात आले.

यावेळी  इतिहास अभ्यासक  गोविंद देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाबराव मोंढे,  डॉ. अभिजित भालचंद्र यांनी  आपल्या मनोगतातून महाराजांचा इतिहास जागवला.तसेच यावेळी काश्मीर येथील पुलवामा अतिरेकींच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी पिंपरी – चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिवंसरा, अशोक शिंगाडे, पंजाबराव मोंढे, सिने अभिनेते जयंत जोशी, सौरभ शिंदे, राजेंद्र भागवत, बाळासाहेब सुबंध, पोपट बच्चे, गोविंद देशपांडे, आयर अंकल, आर्षद शेख, गणेश बच्चे, सिद्धू लोणी, अभिजित पवार, दिवाकर खोले,  हरीचंद्र कुलकर्णी, दशरथ काका, बरीदे आर आदी उपस्थित होते.

शिवजयंती आयोजक व  महावितरण समितीचे सदस्य मधुकर यांनी स्वागत केले. पुणे जिल्हा भाजप रोजगार आघाडीचे अध्यक्ष  सौरभ शिंदे यांनी आभार मानले.