Chinchwad

केशवनगर येथे दोघांना मारहाण करून दुचाकी पळवली

By PCB Author

May 08, 2022

चिंचवड, दि. ८(पीसीबी) -चार जणांनी मिळून दोघांना बांबूच्या काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडली.

यश राजू जाधव (वय 20, रा. केशवनगर, चिंचवड), साहिल काकरिया अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी यश जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी घोलप, जॉनी जगताप, शुभम चौधरी, बद-या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र साहिल या दोघांना बांबूच्या काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. 60 हजार रुपये किमतीची एक केटीएम दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.