केवळ १०० रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदाराला अटक

0
425

लातूर, दि. १५ (पीसीबी) – तहसील कार्यालयात केवळ १०० रुपयांची लाच घेताना नायाब तहसीलदारला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

शिवाजी मारुती पालेपाड असे त्या लाचखोर तहसीलदाराचे नाव असून या प्रकरणी तहसीलदारासोबतच संगणक ऑपरेटरवरही शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलीस ठाणे लातूर येथील तहसील कार्यालयात शिवाजी पालेपाड हे नायाब तहसीलदार तर साळुंके हा संगणक ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. रेशनकार्डवर ऑनलाईनद्वारे पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी तक्रारदार कार्यालयात आला असता साळूंखे याने १०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. पालेपाड यांनीही त्यास पृष्टी देत ५० रुपये साळुंखेकडे जमा करायला सांगितले होते. तक्रादाराने या प्रकरणाची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ आणि १० मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचत साळुंखेला रंगेहात पकडले. केवळ १०० रुपायांसाठी नायब तहसीलदार व ऑपरेटर यांनी केलेल्या कृत्याची चर्चा मात्र तहसील कार्यालय परिसरात रंगली होती.