केरळला युएईकडून ७०० कोटींची मदत

0
953

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भीषण महापुराच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झालेल्या देवभूमी  केरळला पूर्ववत उभे राहण्यासाठी देशासह परदेशातूनही मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यूनायटेड अबर अमिरातने (युएई ) ७०० कोटी रुपयांचा मदतनिधी  दिल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.  

केरळमधील अनेक नागरिक कामाधंद्याच्या निमित्ताने यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत . अमिरातीच्या विकासात केरळी नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे  यूएई सरकारने केरळसाठी मदतनिधी देऊन कृज्ञतता व्यक्त केली आहे.

केरळमध्ये  अतिवृष्टीमुळे  जनजीवन कोलमडून गेले आहे. निम्मे राज्य पुरामुळे जलमय झाले आहे. सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आता केरळला मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरुन मदत केली जात आहे.  सोबत वैयक्तिक पातळीवरही अनेकजण केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हाताने  योगदान देत आहेत.

केरळमधील पुरात आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. शिवाय, कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने केरळला ५०० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.  तसेच विविध राज्यांनीही आर्थिक मदत  केली आहे. महाराष्ट्राने २० कोटी रुपये दिले आहेत. तर ११०  डॉक्टरांच्या टीमसोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन केरळला रवाना  झाले आहेत.