Desh

केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन

By PCB Author

August 18, 2018

तिरुवनंतपुरम, दि. १८ (पीसीबी) – केरळमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर  संयुक्त अरब अमिरातीचे    (युएई) पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तूम यांनी केरळची राज्यभाषा मल्याळम मध्ये टि्वट करत मदतीचे  आवाहन केले आहे. या टि्वटसोबत त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. ‘केरळचे लोक नेहमीच युएईत आपल्या यशाच्या भाग असतात आणि आजही आहेत. आपल्यावर विशेषत: या पवित्र दिवसांत त्यांना मदत करण्याची विशेष जबाबदारी आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.  

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे  संकट उभे राहिले आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो विस्थापित झाले आहेत. ईदपूर्वी आपल्या या भारतीय बांधवासाठी मदतीसाठी हात पुढे करायला विसरू नका, असे शेख यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. केरळला मदत करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. युएईत २० लाखांहून अधिक भारतीय राहतात. यात केरळच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी म्हटले आहे, की शेख यांच्या मदतीच्या भावनेतून हे दिसून येते  की ते केरळचे खरे मित्र आहेत. केरळचे लोक ही मदत कधीही विसरणार नाहीत.