“केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना निवडून देणं ही सर्वात मोठी चूक”

0
580

केरळ,दि.१८(पीसीबी) – प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही.पण सध्याचा यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्विकारत नाही. त्यामुळं तुम्ही राहुल यांना निवडुन का दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे, असं म्हटलं आहे.

केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या लिटरेचर फेस्टिव्हलला रामचंद्र गुहा यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. पाचव्या पिढितील राहुल गांधींचा कठोर मेहनत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निभाव लागूच शकत नाही.

राहुल गांधीना केरळच्या जनतेने निवडून देऊन मोठी चूक केली आहे, असं गुहांनी म्हटलं. एका महान राजकीय पक्षाचं दयनीय फॅमिली फर्ममध्ये रुपांतर झालं आहे. भारतात हिंदुत्वाचा उदय होत असल्यानं हे घडत असल्याची टीका रामचंद्र गुहा यांनी केली.