केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या एकाला औरंगाबादमधून अटक  

0
530

औरंगाबाद, दि. २७ (पीसीबी) –  अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या एकाला  गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतले आहे. सतीश पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखीही काही जणांना अटक करण्यात येणार आहे.

केतकीने काही दिवसांपूर्वी एक व्हीडिओ केला होता. त्यात तिने मराठीतून बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी तिला अश्लील भाषेत ट्रोल केले होते. याप्रकरणी केतकीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे तातडीचे  आदेश दिले होते. त्यानंतर केतकीवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात गोरेगांव पोलिसांनी  कारवाई सुरु केली  होती. आज एकाला औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे.