Maharashtra

केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरणी संग्राम जगतापांना जामीन

By PCB Author

July 07, 2018

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

प्रत्येकी १५ हजार रुपयाच्या जातमुचक्यावर आणि तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदार फिर्यादीवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जगताप सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळाळ्यानंतर जगताप आज (शनिवारी) कारागृहातून सुटण्याची शक्यात आहे.

या प्रकरणी शुक्रवारी सीआयडीने जिल्हा सत्र न्यायालयात दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आरोपपत्रात दोघांचा समावेश नव्हता.

तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात दोघांची नावे समावे होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तर भानुदास कोतर, संदीप गुंजाळ, विशाल कोतकर, रविंद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे. दरम्यान, हत्या आणि हत्याचा कट, आर्म अॅक्टसह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.