केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको; अशा घोषणा टाळायला हव्यात – अजित पवार

0
445

मुंबई,दि.१६(पीसीबी) – काँग्रेसचे नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याचा विचार असल्याचं सांगितलं होतं. ही योजना महाराष्ट्रातही राबवण्याचा विचार होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राऊतांच्या या योजनेला नापसंती दर्शवली आहे.

अजित पवार म्हणाले की, ही योजना व्यवहार्य नाही. अशा घोषणा टाळायला हव्यात नवा अर्थिक बोजा पेलण्याची राज्याची क्षमता नाही. अशा योजना व्यवहार्य नसतात. मंत्र्यांनी अशा घोषणा देणं टाळलं पाहिजे. लोकांना मोफत देण्याची सवय लावू नये, असं असं म्हणत अजित पवारंनी नितीन राऊतांना फटकारलं.

दिल्ली छोटं राज्य आहे. हे मॉडेल महाराष्ट्रात चालू शकणार नाही. फुकट वीज दिली तर मंडळावर १० हजार कोटींचा बोजा पडेल, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.