Bhosari

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला

By PCB Author

February 20, 2019

चिखली, दि. २० (पीसीबी) – डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी डंपरच पेटवून दिला. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी पाचच्या सुमारास केएसबी चौकातील उड्डाण पुलावर घडली.

ओंकार मोरे (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी पाचच्या सुमारास ओंकार त्याच्या दुचाकीवरुन केएसबी चौकातील उड्डाण पुलावरुन कुदळवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी डंपरने ओंकारच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावेळी काही संतप्त नागरिकांनी डंपरच पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.