Maharashtra

केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव; शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात

By PCB Author

July 19, 2018

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव शुक्रवारी (दि.२०) सादर करण्यात येणार आहे. लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता मोदी सरकार निश्चित असून सरकारला कोणताही धोका नाही. मात्र, एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्ते सहभागी असलेल्या शिवसेनेने सातत्याने सरकारच्या धोरणावर टीकेची झोड उठवली आहे. तर काही दिवसापूर्वी अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या टीडीपीच्या खासदारांनी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

मात्र, अविश्वास प्रस्तावाबाबत शिवसेनेची आपली अधिकृत भूमिका उघड केलेली नाही. तसेच उद्धव ठाकरेंकडून याबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय पक्षाच्या खासदारांनी काहीही बोलू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यातील ९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे लोकसभेत ५३४ खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा २६८ वर आला आहे. लोकसभेत भाजप खासदारांची संख्या २७२ इतकी आहे. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करताना कोणतीही अडचणी येणार नाही.